Thursday, October 23, 2025

सरसकट 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या – उद्धव ठाकरे यांची मागणी

बीड

बीड जिल्ह्यासह राज्यातील मराठवाड्याचा दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला . मराठवाड्यातील शेतीचे पुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर पत्रकार परिषेदत त्यांनी ही मागणी केली.पंजाब सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकर्यांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत केली . त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या सरकारने बाधित शेतकर्यांना मदत केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

आपण मराठवाड्यातल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यायला आलेलो आहे असे सांगून त्यांनी जसं मुख्यमंत्री म्हणाले की याच्यात राजकारण आणू नये मला याच्यामध्ये राजकारण आणायचे नाही आहे जर का सरकार कडून होणारी मदत ही तुटपुंजी असेल तर ती सुद्धा स्वीकारता येणार नाही.नागरिकांचे आयुष्य वाहून गेलेले आहेत.

अशा परिस्थितीत त्यांना एकरी तीन ते चार हजार नुकसान भरपाई देता तेवढी रक्कम तर त्यांना साफसफाई करायला लागेल असे ते म्हणाले.

पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने ही मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे जाहीर केलेली आहे. त्या पद्धतीने सरसकट 50 हजार रुपयांची मदत सरकारने द्यायला पाहिजे असे ते म्हणाले .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले कि पवार म्हणतात कि , आम्ही लाडक्या बहिणी वरती 45 हजार कोटी रुपये पण लाडक्या बहिणी योजनेतून जे दीड हजार रुपये त्या घरी त्या बहिणीच्या घरी नेले जात आहेत त्या बहिणीच्या घर आजच्या या परिस्थितीत दीड हजार रुपयांनी सावरणारे आहे का ? त्याचे उत्तर सुद्धा मुख्यमंत्री द्यायला पाहिजे.

मुलांची शिक्षणाची सगळी वाट लागलेली आहेत आणि त्याच्यात भरीत भर म्हणून पीक विम्याची तर वाईटच परिस्थिती आहे बँकांच्या नोटीस शेतकऱ्यांना पाठवल्या जात आहेत. शिवसेना शेतकर्यांच्या बाजूने आहे असे सांगून त्यांनी सरकारने निवडणुकांच्या तोंडावर कर्ज माफी केली होती तशी आता पुन्हा निवडणुकांच्या वेळी करणार का असा सवाल त्यांनी केली .

जशी पंजाब सरकारने केलेली आहे मदत केली पाहिजे आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर माननीय पंतप्रधान महोदयांनी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये टाकलेले आहेत. महिलांच्या खात्यात हे पंतप्रधानांनी बिहारमधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यात टाकले आहेत अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान यांनी तयार केलेला पी एम केअर फंड मधून शेतकर्यांना निधी द्यावा . त्याची माहिती नागरिकांना दिली जात नाही. त्याचा कुठे वापर होतो, तसेच त्याचा कुठे वापर केला जातो हे हि कळत नाही त्यासाठी मोदी या फंडाचा वापर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी करावा अशी मागणी त्यांनी केली .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles