Thursday, October 23, 2025

शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या – डॉ.ज्योती मेटे

बीड

beed jyoti mete सरकारने पिकविमा योजनेत केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. विमा योजनेत सहभागी होण्याची तारीख ३१ जुलै असताना राज्यात फार कमी शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केले आहेत. आज पिक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता कमी आहे. येणाऱ्या काळात पावसाच्या लहरीपणामुळे पीक विम्या पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याकरिता शासनाने पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी आणि पीक विम्याचे नियम पूर्वीप्रमाणेच करावेत अशी मागणी शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी केली आहे.

राज्य सरकारने सुरू असलेली एक रुपयात पिक विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्याला जास्तीची रक्कम भरावी लागते. या निर्णयामुळे शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. तसेच पिकविमा योजनेच्या भरपाईत केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई दिली जाणार आहे. पूर्वी चार ट्रिगरच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात होती, मात्र आता त्यात बदल झाल्याने शेतकरी नाराज आहे.

प्रधानमंत्री कृषी पीक विमा योजना खरीप हंगाम २०२५ च्या विमा हप्ता भरण्यासाठीचा एक दिवस बाकी असतानाही राज्यातील नगन्य शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरल्याचे निदर्शनास आले आहे. मागील योजनेतील महत्त्वाचे जे ट्रिगर होते त्यातील एक ट्रिगर हा पावसाने सतत २१ दिवसाचा खंड दिल्यास २५ टक्के अग्रीम मिळण्याची यात तरतूद होती. ती तरतूद वगळून केवळ नुकसान आधारित पिक विमा मिळण्याची तरतूद करण्यात आलेली असणे आणि शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार प्रीमियम भरावा लागत असणे या बाबींमुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय संभ्रमाचे आणि निरुत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळातील निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्यास हा शेतकरी पूर्णपणे कोलमडून जाणार आहे. जेव्हा महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात तेव्हा या बाबींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना या पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल आणि पुढील अनावस्था प्रसंग टळेल यासाठी पिक विमा भरण्याकरिता शेतकऱ्यांना मुदतवाढ द्यावी तसेच पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणेच करावेत अशी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री आणि मा.कृषिमंत्री यांना कळकळीचे विनंती करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles