Thursday, October 23, 2025

महसूल विभागांच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड

beed revnue week 2025 राज्यभरात महसूल विभागामार्फत ०१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महसूल व वन विभागाच्या कालच्या (मंगळवार, ता.२९ जुलै) शासन निर्णयानुसार हा सप्ताह विविध उपक्रमांनी बीड जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे.

जिल्ह्यातील जनतेने या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या सप्ताहादरम्यान महसूल विभागाच्या योजना, कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.


महसूल सप्ताहातील कार्यक्रम :


०१ ऑगस्ट: “महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहास शुभारंभ” तसेच “महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण”


०२ ऑगस्ट: “शासकीय जागेवर सन २०११ च्या पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रम”


०३ ऑगस्ट: “पाणंद/शिवारस्थळांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे”


०४ ऑगस्ट: “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान प्रत्येक मंडळानिहाय राबविणे”


०५ ऑगस्ट: “विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे”


०६ ऑगस्ट : “शासकीय जमिनींवरील अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासनानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे”


०७ ऑगस्ट: “M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्वाभ्यास घेणे आणि महसूल सप्ताहाचा समारोप.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles