बीड
beed zilla teacher award बीड जिल्हा परिषदेने जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक आणि माध्यमिक विभागातून पुरस्कारासाठी अर्ज मागवले आहेत. हे अर्ज थेट जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी जिल्हा परिषदेचे मार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणारे शिक्षकांना जिल्हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक त्याचबरोबर दिव्यांग शिक्षक, कला क्रीडा कार्यानुभव यामध्ये उत्कृष्ट असणाऱ्या शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन प्राथमिक,दोन माध्यमिक आणि एक विशेष शिक्षक ज्यामध्ये (कला क्रीडा कार्यानुभव आणि दिव्यांग यांचा समावेश असेल) अशी तालुक्यातून एकूण पाच शिक्षकांची शिफारस करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
Read more: बीड जिल्ह्यात गट गण रचनेवर किती आले आक्षेप? मंगळवारी सुनावणी
यासाठीच्या अटी आणि शर्ती याप्रमाणे.
31 मे 2025 रोजी मुख्याध्यापक ज्यांची जिल्ह्यातील सेवा वीस वर्ष आणि शिक्षकांची जिल्ह्यातील सलग सेवा पंधरा वर्षे असावी.
जे शिक्षक प्रतिनियुक्तीवर आहेत व नियमित वर्ग अध्यापन करत नाहीत अशा शिक्षकांची शिफारस करण्यात येऊ नये.
शिक्षकांची शैक्षणिक कार्यामध्ये सामाजिक कार्य बाला उपक्रम समाजाचा सहभाग विद्यार्थ्यासाठी राबवलेले उपक्रम याबाबी विचारात घेऊन शिफारस करावी.
पोलीस गुन्हा दाखल झालेले विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्थापित असलेल्या शिक्षकांची शिफारस करण्यात येऊ नये.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या शिक्षकांची प्रस्ताव पाठविण्यात येऊ नयेत.
हे प्रस्ताव शिक्षकांनी गट विकास अधिकारी यांच्या संमतीने थेट जिल्हा परिषद शिक्षण विभाग बीड येथे दाखल करावयाचे आहे यासाठीचा अंतिम दिनांक हा पाच ऑगस्ट 2025 असा आहे.
सोबत अर्जाच नमुना दिला आहे.
DocScanner-30-Jul-2025-3-16-pm