बीड प्रतिनिधी.
बीड जिल्हा वकील संघाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी ॲड. सुभाष पिसोरे, उपाध्यक्ष ॲड. रघुराज देशमुख, सचिव ॲड. सुभाष काळे, सहसचिव ॲड. धीरज कांबळे, कोषाध्यक्ष ॲड. योगेश टेकाळे ग्रंथपाल सचिव ॲड. सय्यद अजीम आणि महिला प्रतिनिधी पदी ॲड. मनीषा गडकर कुपकर या विजय झाल्या.
दोन पॅनल मध्ये प्रामुख्याने ही निवडणूक पार पडली. सुभाष पिसोरे यांचे पॅनलचे सर्व उमेदवार यात मोठ्या फरकाने विजयी झाले.
जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये काम पाहिलेले निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र किर्दात, निरीक्षक ॲड. पी. ए. हुंबे, ॲड. सुनंदा जाधव तसेच ॲड. सुधीर जाधव ॲड. उमेश धांडे, ॲड. रमेश राऊत, ॲड. अभिजीत डोंगरे, ॲड. लिंबा लाखे, ॲड. सदानंद वाघमारे ॲड. अजित देशमुख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली.