आष्टी
सिस्पे, इन्फिनाइट बीकॉनसह इतर कंपन्यांच्या नावाने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक ५ ते १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवीत फसवणूक केल्याप्रकरणी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झालेल्या या कंपन्यांमध्ये आष्टी तालुक्यातील अनेक नागरिकांनी गुंतवणूक केली.
कमी काळात श्रीमंत होण्याचे स्वप्न या कंपनीने दाखवल्याने अनेकांनी यामध्ये गुंतवणूक केली. मोबाईल अँप वर या कंपनीचा ग्राहकांना आपल्या परतावा रक्कम दिसत असे. त्यामध्ये होणारी दैनिक वाढ पाहून गुंतवणूक करणारे खुश होत असत. त्यातून या साखळीचा प्रवास पुढे झाला.
अहिल्या नगर जिल्ह्यात या कंपनीच्या संचालकांवर श्रीगोंदा, पारनेर सह इतर ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर आता आष्टी तालुक्यातही पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
रोहिदास पोपट काळे (वय ४६ वर्षे) रा. पारोडी याच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात आरोपी अगस्त मिश्रा, राहूल काळोखे, संचालक, गौरव सुखदेवे, डेजीग्रेटेड डायरेक्टर, प्रसाद कुलकर्णी, डेजीग्रेटेड डायरेक्टर, सचिन खडतरे, डेजीग्रेटेड डायरेक्टर, चेतन घर, डेजीवेटेड डायरेक्टर, ययात मिश्रा, डेजीग्रेटेड डायरेक्टर च नवनाथ जगन्नाथ अवताडे, शुभम नवनाथ अवताडे, सुवर्णा नवनाथ अवताडे, ओंकार भुसारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंतवणूकीवर दरमहा ८ ते १० टक्के परतावा मिळवून देतो असे अमीष दाखवुन व गुंतवणूक करण्याबाबतची सविस्तर माहिती दिली म्हणून फिर्यादी यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक म्हणून रक्कम रुपये ३ लाख २० हजार रुपये (३,२०,०००/-) आरोपीच्या असलेल्या नमुद सीससे व ट्रेडदा ईन्वेस्टमेंट प्रा.लि.या. ब्रोकींग फर्म कंपनीच्या खात्यावर वर्ग केले. फिर्यादीच्या ओळखीच्या ५०० ते ६०० व्यक्तींची नमुद कंपनीमध्ये गुंतवणुक केली. मार्च २०२५ पासून कंपनीचे फिर्यादी व इतर व्यक्तीना दरमहा ठेब असलेले परतावा बंद केला. त्यामुळे त्यांनी कंपनीकडे त्यांचे पैसे मागितले असता कंपनीने उडवा उडवीचे उत्तरे दिली व गुंतवणकदारांचे पैसे परत दिले नाही.त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.
आष्टी तालुक्यात अनेक जिल्हा परिषद शिक्षक यामधे अडकले आहे. सुरुवातीच्या काळात या कंपनीच्या प्रमोटरला चांगला कमिशन मिळत असल्याने त्यांनी सहकारी लोकांना या कंपनीकडे आकर्षित करत त्यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले. अनेक नागरिकांनी वेगवेगळ्या बँकेत असलेल्या ठेवी काढून त्या या कंपन्यांमध्ये गुंतवल्या. कमी काळात जास्त लाभ देण्याचे लालच दाखवल्यामुळे अनेकांनी यामध्ये गुंतवणूक केली. काहींनी बँकांचे पतसंस्थांचे कर्ज काढून यामध्ये गुंतवणूक केली.
आष्टी तालुक्यात अशा गुंतवणूकदारांची संख्या अधिक आहे तसेच ही रक्कम चारशे कोटी होऊन अधिक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता ही रक्कम मिळणार का की डुबणार यामुळे नागरिक चिंतेत आहेत.यामधे उच्च पदस्थ असल्याचे समजते.