Thursday, October 23, 2025

चकलांबा वाळू तस्करांना पुन्हा दणका; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त



चकलांबा


sand mafiya in gevrai पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाईच्या दिलेल्या आदेशानुसार चकलांब्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पुन्हा वाळू तस्करांवर कारवाई केली आहे.गोदापात्रात केलेल्या या कारवाईत 30 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी चकलांबा-पोलीस ठाण्यात 1) बाळू पवार रा. गुळज व एक अद्यात अश्या 02 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मागच्या काही दिवसांत वाळू तस्करांवर मोठ्या कारवाया केल्या आहेत. मंगळवारी देखील (दि.12/08/25) रोजी देखील पंचांळेश्वर येथे नदी पात्रात दोन ट्रॅक्टर चोरटी वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना करत कारवायाचे आदेश दिले.

त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असता यावेळी वाळू तस्करी करणारे दोन टॅक्टर आले.त्यानुसार दोन्ही वाहने ठाण्यात आणण्यात आली असून या कारवाईत 11 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,पोलीस उपअधीक्षक श्री.राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील Asi चांदमारे हनुमान इंगोले सुरेश सुरवसे प्रशांत कल्याण घोंगडे आदींनी केली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles