जालना
24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार केला या आरोपावरून 28 शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल.
जालन्यात अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळाप्रकरणी 28 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत. 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार केला या आरोपावरून 28 शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.अंबड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सहायक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांचे लॉगिन, पासवर्डचा गैरवापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी अतिवृष्टी आणि गारपिटचे अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आला होता. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी संगनमताने 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. समितीने दिलेल्या अहवालानुसार तब्बल 23 जणांचे निलंबन करण्यात आले,तर इतरांविरुद्ध विभागीय चौकशीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते.हा मुद्दा विधीमंडळाच्या अधिवेशनातही मोठ्या प्रमाणावर गाजला होता.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी आधीच शेतकऱ्यांचे अनुदान लाटणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना प्राधिकृत करून तक्रार नोंदविण्याच्या सूचना दिल्या. सहायक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तब्बल 28 शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. फिर्यादीनुसार, आरोपींनी शासकीय निधी स्वतःच्या फायद्यासाठी बनावट दस्तऐवजाद्वारे हडप केला, संगणक प्रणालीत फेरफार केला, तसेच कागदोपत्री व संगणकीय अभिलेख नष्ट करून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. या घोटाळ्यातील आरोपींमध्ये महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, संगणक ऑपरेटर व नेटवर्क इंजिनियर यांचा समावेश आहे.
1) गणेश ऋषींदर मिसाळ, 2) कैलास शिवाजीराव घारे, 3) विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर, 4) बाळु लिंबाजी सानप, 5) पवनसिंग हिरालाल सुलाने, 6) शिवाजी श्रीधर ढालके, 7) कल्याणसिंग अमरसिंग बमनावत, 8) सुनिल रामकृष्ण सोरमारे, 9) मोहित दत्तात्रय गोषिक, 10) चंद्रकांत तुकाराम खिल्लारे, 11) रामेश्वर नाना जाधव, 12) डिगंबर गंगाराम कुरेवाड, 13) किरण रविंद्रकुमार जाधव, 14) रमेश लक्ष्मण कांबळे, 15) सुकन्या श्रीकृष्णा गवते, 16) कृष्णा दत्ता मुजगुले, 17) विजय हनुमंत जोगदंड, 18) निवास बाबुसिंग जाधव, 19) विनोद जयराम ठाकरे, 20) प्रविण भाऊसाहेब शिनगारे, 21) बप्पासाहेब रखमाजी भुसारे, 22) सुरज गोरख बिक्कड, 23) सुशिल दिनकर जाधव (सहायक महसूल अधिकारी), 24) वैभव विश्वंभरराव आडगांवकर (नेटवर्क इंजिनियर), 25) विजय निवृत्ती भांडवले (तत्कालिन संगणक परिचालक), 26) रामेश्वर गणेश बारहाते (महसूल सेवक), 27) आशिष प्रमोदकुमार पैठणकर (सहायक महसूल अधिकारी) आणि 28) दिनेश बेराड (सहायक महसूल अधिकारी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 28 आरोपींची नावं आहेत. या प्रकरणातील पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.
बाईट अजयकुमार बन्सल.
पोलिस अधिक्षक,जालना.