बीड
मिशन जरेवाडी प्रकल्प आणि पायाभूत संख्याज्ञान साक्षरता FLN अंतर्गत जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद बीड येथे करण्यात आले आहे.यामधे आष्टी तालुक्यातील पाच शाळांचा समावेश आहे. केंद्रीय प्राथमिक शाळा धानोरा यांच्यासह इतर शाळांचा समावेश आहे.
आष्टी तालुक्यातील पाच शाळांमध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा धानोरा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी घाटा पिंपरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरोडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव दाणी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा नंबर 1 यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत संख्याज्ञान साक्षरता सुधारण्यासाठी जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आंबेजोगाई वोवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन यांच्या समन्वयातून मिशन जरेवाडी प्रकल्प राबविण्यात आला.
या प्रकल्पाची अंमलबजावणी शाळा, केंद्र आणि तालुका पातळीवर करण्यात आली. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखन कौशल्य प्रगती झाली असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकल्पाची व्यवस्थित अंमलबजावणी केल्यामुळे त्याचे परिणाम आता जिल्ह्यातील विविध शाळांमधून दिसू लागले आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये फंडामेंटल लिटरसी अँड न्यू मराठी म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आवश्यक आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यामध्ये एफ एल एन fln हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमामध्ये यशस्वीरित्या कार्य केलेल्या शाळांचा जिल्हा परिषद यांच्या वतीने गौरव करण्यात येत आहे.
यामध्ये आंबेजोगाई तालुक्यातील सहा शाळा, आष्टी तालुक्यातील पाच शाळा, बीड तालुक्यातील पाच शाळा, धारूर तालुक्यातील चार शाळा,
गेवराई तालुक्यातील चार शाळा केज तालुक्यातील पाच शाळा माजलगाव तालुक्यातील पाच, परळी तालुक्यातील चार शाळा, पाटोदा तालुक्यातील चार शाळा, शिरूर तालुक्यातील पाच शाळा वडवणी तालुक्यातील पाच शाळा यांचा समावेश आहे.
एकूण 52 शाळांचा यामध्ये सन्मान केला जाणार असून त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातून सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणूनही सन्मान केला जाणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी दिली.