बीड, दि. 14
बीड जिल्ह्यात 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड ते अहिल्यानगर या मार्गावर पहिल्यांदच रेल्वे प्रत्यक्षात धावणार आहे. त्या अनुषंगाने रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.
त्याअनुषंगाने आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक दरम वीर मीणा आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड रेल्वे स्थानकाला प्रत्यक्ष भेट देवून पूर्वतयारीची पाहणी करत संबंधीताकडून सविस्तर आढावा घेतला.
यावेळी पीसीएसटीईचे मनिंदर सिंग उप्पल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, मुख्य अभियंता बी.के.सिंह, उपमुख्य अभियंता डी.डी.लोळगे, मुख्य अभियंता (इलेक्ट्रीक) विनीत कुमार, उपमुख्य अभियंता (इलेक्ट्रीक) ज्ञानेंद्रसिंग, विभागीय अधिकारी जीतेंद्र सिंह तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पथकाने यावेळी संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. हा कार्यक्रम राज्य सरकारच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस उत्सव आणि माननीय पंतप्रधानांच्या संबोधित होणाऱ्या आरोग्य अभियान कार्यक्रमाचा भाग असणार आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक दरम वीर मीणा यांनी आगामी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.