आष्टी : प्रतिनिधी
manoj jarange patil visits kada कडा व परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी आलेल्या पुरामुळे शेतकरी व व्यावसायिकांचे अतोनात असे नुकसान झाले असून त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मनोज दादा जरांगे पाटील यांनी मंगळवारी आष्टी तालुक्यातील नुकसानग्रस्तांची पाहणी करताना ते बोलत होते.
आष्टी तालुक्यातील धामणगाव ,घाटा ,पिंपरी दादेगाव ,डोंगरगण ,टाकळी ,कडा,शिराळ
टाकळसिंग ,हिंगणी येथील पूरग्रस्तांच्या व्यथा मनोज जरांगे पाटील यांनी ऐकून घेतल्या.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,पंचनामे करताना शेतकऱ्यांचे सरसकट नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासनास अहवाल सादर करावा .शासनाकडून मदत कशी मंजूर करायचे हे मी पाहून घेतो असा धीर शेतकऱ्यांना दिला.
कडा येथील पुरामधे अडकलेल्या सापते कुटुंबाची भेट घेतली त्यावेळी कुटुंबाने पुरात अडकल्यानंतर काय हाल झाले हे जाणून घेताना जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले होते.
त्यानंतर कडा येथील अनेक छोटे-मोठे व्यवसायिकांचे पुरामुळे दुकाने वाहून गेले आहेत यामध्ये कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे या सर्व व्यवसायिकांची तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी पाटील यांनी केली.
पुरामध्ये शेकडो जनावर आहे वाहून गेले आहेत.याचे पंचनामे करताना पशुधन अधिकारी हे मृत जनावर दाखवून त्याचे पोस्टमार्टम करावे लागेल असे सांगत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी करताच त्यावर जरांगे पाटील म्हणाले की,पुरामध्ये वाहून गेलेले जनावरे पंचनामा करण्यासाठी कुठून सापडून आणायचे ? याचा शासनाने विचार करून शेतकरी जे संख्या सांगेल त्या संख्येप्रमाणे नोंद घेऊन जनावरांची भरपाई देण्याची मागणी यावेळी केली.
तसेच व्यवसाय करणाऱ्या व शेतकऱ्यांना खचून जाऊ न देण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले .आपण पुन्हा नव्या उमेदीने व्यवसायाला व शेतीसाठी तयार राहावे असे आवाहन पाटील यांनी केले.