Thursday, October 23, 2025

बीड जिल्ह्यातील दोन शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

बीड

Krantijyoti Savitribai phule state teacher award 2025 राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार बीड जिल्ह्यातील दोन शिक्षकांना जाहीर झाला आहे. यामध्ये एक माध्यमिक शिक्षक एक प्राथमिक शिक्षक यांना दिला जाणार आहे.

राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
प्राथमिक शिक्षक विभागात चंद्रकन्या अनंत सारसेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडसोन्ना बीड, माध्यमिक शिक्षक विभागात  डॉक्टर शशिकांत विश्वनाथ पुरी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा राडी तालुका आंबेजोगाई यांना जाहीर झाला आहे.

येत्या 22 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये या राज्यशिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून राज्यातील 109 शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामध्ये प्राथमिक शिक्षक 38 माध्यमिक शिक्षक 39 आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक 19 आठ विभागातून थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 8 विशेष कला क्रीडा दोन दिव्यांग शिक्षक एक स्काऊट गाईड दोन असे एकूण 109 पुरस्कार दिले जाणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles