आष्टी
Heavy rainfall in ashti बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात रविवारी आणि सोमवारी जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे पुन्हा गावात पाणी शिरले. कडा येथील कडी नदीला आलेल्या पुरामुळे पाणी पुन्हा पुलाच्या जवळ पोहचले. तर गावात पाणी शिरले.
तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगात जोरदार अतिवृष्टी झाली त्याचा परिणाम नद्या आणि ओढ्यावर झाल्याने दुथडी भरून वाहू लागल्या. घाटा पिंपरी, दादेगाव , हिवरा या भागातून कड्याला जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. नगरहून कड्याकडे जाणाऱ्या महामार्गावरील सारोळा बद्दी येथील तात्पुरता करण्यात आलेल्या पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.
तालुक्यातील धामणगाव , कडा ,धानोरा येथेही जोरदार पाऊस झाला. रविवारी दौलवडगाव महसूल मंडळात 80 मिलिमीटर धामणगाव महसूल मंडळात 67.5 मिलिमीटर डोईठाण महसूल मंडळात 67 मिलिमीटर धानोरा महसूल मंडळात 65.8 मिलिमीटर आणि दादेगाव महसूल मंडळात 65.8 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.