Thursday, January 22, 2026

अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत गोळीबार ?


निखिल कांबळे


आष्टी

ashti ambhora Shot in the chest अंभोरा-हिवरा रस्त्यावर तरूणांचा मृतदेह आढळून आला असुन त्याच्या छातीत गोळी झाडल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसत असून मृतदेहाजवळ दुचाकीसह विनापरवाना पिस्टल आढळून आल्याची खळबळजनक घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे.बाळा रामदास चव्हाण असे मृत तरूणाचे नाव आहे.


आष्टी तालुक्यातील वाघळुज येथील मयुर उर्फ बाळा रामदास चव्हाण वय वर्ष ३५ याचा अंभोरा- हिवरा रस्त्यावरील कच्या रोडलगत सकाळी साडेदहाच्या दरम्यान मृतदेह आढळून आल्याचे येणाऱ्या जाणाऱ्या काही लोकांना दिसल्याने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी लागलीच घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर एक दुचाकी रोडच्या कडेला लावलेली व छातीत गोळी लागल्याचे आणि मृतदेहाजवळ पिस्टल आढळून आल्याचे दिसून आले.ही हत्या असावी की आत्महत्या हे अद्याप समजले नसले तरी मृत्यूचे गुढ कायम आहे.


घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे,अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे,आदिनाथ भडके,पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलीस अमलदार शिवदास केदार, अमोल ढवळे, उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles