Sunday, October 19, 2025

बेलगावच्या रेणुकामातेचा घटस्थापना,शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन

आष्टी


ashti belgaon navratri utsav आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील तरुण दरवर्षी श्री क्षेत्र माहूरगड ते बेलगाव ४५० कि.मी.चे अंतर पायी चालत रेणुकाआईची ज्योत मोठ्या भक्ती भावाने उत्साहात घेऊन येतात. या पायी ज्योत सोहळ्याचे बेलगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकाकडून मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आले.

आज देवीच्या मंदिरात घटस्थापना होणारा आहे.या नवरात्र उत्सवानिमित्त ग्रामस्थांकडून नऊ दिवस शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी बेलगाव यांनी केले आहे.

आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील रेणुकामाता देवस्थानच्यावतीने सोमवार दि.२२ ते ०१ सप्टेंबर या काळात रेणुकामातेचा नवरात्रोत्सव आरंभ होत आहे.यानिमित्ताने बेलगाव येथील जागृत देवस्थान माहूरगडचे उपस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणुकामाता मंदिरात आज सोमवार दि.२२ सप्टेंबर रोजी विधिवत पुजाअर्चा करून बेलगाव ग्रामस्थ व देवीभक्तांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात येणार आहे.


दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बेलगाव येथील तरुणांनी श्री क्षेत्र माहूरगड ते बेलगाव ४५० कि.मी.चे अंतर पायी चालत देवीची ज्योत घेऊन आले असून या पायी ज्योत चे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. गेल्या १७ वर्षांपासूनची ही परंपरा कायम आहे.यामध्ये जवळपास २०० तरुण सहभागी होतात.

बेलगाव आणि परिसरात रेणुकामातादेवीचे महात्म आहे.संपूर्ण पंचक्रोशीत ही देवी नवसाला पावते म्हणून तिची ख्याती आहे.निसर्गरम्य वातावरणात असलेले देवीचे मंदिर हे राज्यातील कानाकोपऱ्यातुन व आष्टी तालुक्यातील भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.रेणुकामातेचे महात्म्य पूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.

या देवस्थानला शासनाचा “क” दर्जा प्राप्त असून या देवस्थान परिसरात सद्यस्थितीला कोट्यावधी रुपयाचे विकास कामे प्रगतीपथावर असून लवकरच हे देवस्थानचा कायापालट होणार आहे.बेलगाव ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेभावाने नवरात्र महोत्सव साजरा करतात.

९ दिवस विविध कार्यक्रमाची धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते.शेवटच्या दिवशी महाप्रसादाने सांगता होणार असून या नवरात्र उत्सवाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ बेलगाव यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles