Wednesday, October 22, 2025

आष्टी तालुका पावसाने झोडपला; कड्यासह अनेक गावात पाणी घुसले

कडा

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांना पावसाचा जोरदार फटका बसला. जोरदार पावसामुळे पाणी गावांमध्ये घुसले. रहदारीसाठी असलेले छोट्या नदी नाल्यांवरचे  पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा एकमेकापासून संपर्क तुटल्याचे चित्र आष्टी तालुक्यात पाहावयास मिळाले.

आष्टी तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या गर्भगिरी डोंगररांगांवर मुसळधार पाऊस झाला. रात्री झालेल्या या पावसाने सर्वत्र  हाहाकार माजवला. या पावसाने दौलावडगाव घाट देऊळगाव गौखेल उंदरखेल या भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. याचा परिणाम देवळाली , हिवरा सुलेमान देवळा कडा या गावांमध्ये पाणी शिरले. या गावांना जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सकाळपासून या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली. कडी नदीला आलेल्या पुरामुळे आणि पुलाचे काम चालू असल्याने पाणी  थबकून विस्तारत गेले परिणामी कड्या गावात तील ग्रामपंचायत पर्यंत पाणी पोहोचले. अनेक घरे पाण्याखाली गेले रस्ते पाण्याखाली गेले त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते. तर अनेकांच्या दुचाकी चार चाकी मध्ये गाडी पाणी शिरले. नदीच्या कडेला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घर संसार व उपयोगी वस्तू वाहून गेल्या.

या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्वच नद्यांना पूर आले. परिणामी शाळांनाही सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या.

धानोरा येथे असलेल्या कांबळी प्रकल्प पूर्ण भरला असून या प्रकल्पाच्या सांडव्या वरती पाणी वाहत असल्यामुळे नगर आष्टी रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे. वरच्या भागात असलेल्या उंदरखेल तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे त्यामुळे कांबळी प्रकल्पांमध्ये पाणी वाढले आणि सांडवा प्रवाहित झाला.

धामणगाव परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धामणगाव वरून कडा येथे येण्यासाठी असलेल्या देवी निमगाव पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे पाथर्डी कडून कडा आष्टी कडे येणारे वाहतूक बंद झाली आहे. शिरा चव्हाण निमगाव या भागातही जोरदार पाऊस झाला तसेच वरच्या भागातून येणारे पाणी यामुळे शिराळ नदी नाल्यावर  पाणी आल्याने ही वाहतूकही काही काळ बंद पडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles