आष्टी तालुक्यातील सय्यद मीर लोणी पिंपळा या मार्गे येणारी अहिल्यानगर ते पिंपळा बस बंद करण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळ आगार अहिल्यानगर यांनी घेतला आहे.
हा निर्णय या मार्गावरील रस्ता खराब असल्यामुळे बस द्वारे प्रवासी वाहतूक करणे, धोकेदायक झाले असल्याचे मत अहिल्यानगरच्या आगार प्रमुखांनी व्यक्त केली असून त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे आणि पर्यायाने प्रवाशांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे या बस बंद करण्यात आल्याची पत्र त्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक पिंपळा ग्रामपंचायत आणि सय्यद मीर लोणी ग्रामपंचायत यांना दिले आहे.
या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की मांडवा ते लोणी पिंपळा रस्ता पावसामुळे खराब झालेला आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणे धोकेदायक झाले आहे त्यामुळे बस घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा प्रस्ताव प्रवासी वाहतुकीस अत्यंत धोकादायक झाला असून त्यामुळे राज्यपाल परिवहन महामंडळाच्या बसचे स्प्रिंग चे स्प्रिंग व टायरचे नुकसान होऊन अथवा काचा गळून पडत आहेत त्यामुळे मंडळाचे नुकसान आर्थिक नुकसान होत आहे जोपर्यंत रस्ता व्यवस्थित होत नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ता प्रवासी वाहतुकीस योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले मिळत नाही तोपर्यंत बसच्या फेऱ्या बंद करण्यात येत असल्याचे या पत्राद्वारे त्यांनी कळवले असून जेव्हा प्रमाणपत्र मिळेल त्यानंतर या मार्गावरील बस चालू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.