Thursday, October 23, 2025

कंटेनर ने सहा जणांना चिरडले

बीड

बीड अपघात beed accident 6 died दुचाकी वरून जाणारे आणि रस्त्यावरील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या सहा जणांना कंटेनर ने उडविण्याची घटना छत्रपती संभाजी नगर बीड महामार्गावर नामलगाव फाट्यानजिक घडली.

यामधे सहा जणांचा मृत्यू झाला. दोन जखमींना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.यातील काही जण दुचाकी वर होते तर काही पोलिस भरतीची तयारी करत होते.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड जवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सकाळी आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सहा जणांना चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुचाकी वरील अपघातातील जखमी मयत हे पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र मृत व जखमींची नावे अद्याप समजू शकलेले नाहीत.

काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारे कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles