अंबाजोगाई
भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून सर्व सामान्य शाखाध्यक्ष पासून देशाच्या राष्ट्रीय अध्यक्ष च्या पदापर्यंत व सर्व सामान्य ग्रामपंचायतच्या सदस्या पासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत आपल्या कार्य कौशल्याच्या बळावर पोहोचण्याची ताकद केवळ भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद आणि प्राण कार्यकर्ता आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बळावर भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. याच प्रतिभावान, जिवलग व बलाढ्य कार्यकर्त्यांच्या बळावर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे व प्रमोद जी महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष उभा केला त्यामुळे भविष्यात देखील काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देणारा केवळ एकमेव पक्ष असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले.
आंबेजोगाई येथे बीड जिल्ह्यातील “माझा भाऊ, देवा भाऊ” या उपक्रमांतर्गत राख्यांचे संकलन कार्यक्रम प्रसंगी आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजपा बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, युवा नेते अक्षय मुंदडा, राम कुलकर्णी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष उषा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे व प्रमोद महजन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीतील नेत्यांची फळी निर्माण झालेली आहे. तळागाळातील सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सदैव तत्पर असतात.
१ राखी पंकजाताईंनी प्रत्यक्ष ‘देवाभाऊ’ यांना बांधलेली आहे तर बीड जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात जमा झालेल्या १५५७० राख्या आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोच करणार आहोत असेही लोणीकर यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहेत त्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने देखील राज्यातील महिलांसाठी अनेक प्रभावी योजना राबवल्या गेल्या आहेत .
त्यामध्ये उज्वला गॅस योजने पासून लाडकी बहीण योजनेपर्यंत अनेक योजनांचा उल्लेख करता येईल. महाराष्ट्र सरकारने व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले आहेत त्याविषयी स्वराज्यातील माता-भगिनींचे मत जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त “माझा भाऊ, देवा भाऊ” हे महाअभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात आले होते.
त्यामध्ये लाभार्थी महिलांचे लाभ घेतलेल्या योजनेबद्दल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दलचे मत विचारात घेण्यात आले होते त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावाप्रमाणे पाठीशी उभे राहिले ही भावना व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी पाठवण्याच्या उपक्रम हाती घेण्यात आला होता असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले.
पक्षाच्यावतीने आयोजित “माझा भाऊ, देवाभाऊ” राखी संकलन कार्यक्रमादरम्यान आमदार बबनराव लोणीकर यांनी बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची आठवण काढताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला व प्रचंड टाळ्यांच्या कडकडात लोणीकरांच्या भाषणाला सुरुवात झाली.
पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आंबेजोगाई हे स्वर्गीय प्रमोद महाजनांसारखे प्रतिभावान नेतृत्व देणारे शहर आहे. दुर्दैवाने महाजन साहेबांच्या अकाली निधनामुळे आपण देशाच्या अत्यंत प्रतिभावान व कदाचित पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकणाऱ्या नेत्याला मुकलो, असेही आमदार लोणीकर यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना आमदार बबनराव म्हणाले की, स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्यासोबतही आपण विधिमंडळात काम केले असून त्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा वसा आणि वारसा संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात आमदार नमिता ताई मुंदडा यांच्या रूपाने आजही केज विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून राबवला जात आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यावेळी सचिन दाभाडे, राजेंद्र पवार, उद्धव रासकर, विनायक रत्नपारखी, रूपाली कचरे, अभिजीत सोळुंके, संदीप काचगुडे, संजय गंभीरे, गोकुळ कदम, भगवान केदार, संदीप पाटील, वसंत निर्मळ, राजेश गीते, संतोष भगत, मनोज पाटील, अशोक लोढा, अशोक रसाळ, राणा डोईफोडे यांच्यासह लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती.