Thursday, October 23, 2025

धारूर घाटात थरारक पाठलाग;दारूसह १४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

बीड

Beed excise duty raid बनावट देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती दारूबंदी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक विश्वजीत अ.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.०२ यांनी रविवारी रात्री १० वाजता धारूर घाटामध्ये सदर वाहनाचा थरारक पाठलाग करून दारूसह १४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.०२ चे दुय्यम निरीक्षक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे की, श्रीराम रंगाराव जाधव, वय ३६ वर्षे (रा.शिवाजीनगर माजलगाव, ता.माजलगाव, जि.बीड) आणि पवन सुरेश मुळे, वय २५ वर्षे (रा.श्रीरंगवाडी, ता.माजलगाव, जि.बीड) हे दोघेजण रविवारी बनावट देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती दारूबंदी विभागाच्या भरारी पथकाला मिळताच थरारक पाठलाग करून रात्री उशिरा १० वाजता धारूर घाटामध्ये सदर वाहनाला ओव्हरटेक करून थांबविले, आणि तपासणी केली असता त्या वाहनात ९० मिली क्षमतेच्या ५० बनावट देशी दारूच्या (देशी दारू संजिवनी बॉबी संत्राचे) बॉक्स आढळून आले.

यामुळे तात्काळ कारवाई करीत महिंद्रा कंपनीचे चार चाकी वाहन (एक्सयुव्ही-५००) ज्याचा नोंदणी क्रमांक (एम एच – ४६, पी – ४३१८) व विविध कंपनीचे दोन भ्रमणध्वनी सह एकूण १४ लाख ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करून दारूबंदी कायद्यानुसार दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक विश्वजीत अ.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.०२ चे दुय्यम निरीक्षक जगदीश व्ही.कोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर.बी.कदम व जवान सर्वश्री आर.ए.जारवाल, एस.व्ही.धस, एस.पी.कदम, एस.एस.चाटे, बी.एस.वायबट यांनी पार पाडली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जगदीश व्ही.कोरे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles