शिरूर कासार
Beed gauri ganpati hands making गणपती उत्सवात येणारा गौरी महालक्ष्मी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या गौरी उत्सवाच्या काळात गौरी बसवण्यासाठी लागणारे गौरीचे हात यांना मोठी मागणी असते.
घरी घरी बसवणाऱ्या महालक्ष्मी गौरींचे महत्त्व ओळखून बीड जिल्ह्यातील ब्रम्हनाथ येळंब येथील महिलानी गटाच्या माध्यमातून हात बनवण्याचा व्यवसाय सुरू केला, या व्यवसायाच्या माध्यमातून या बचत गटाला आर्थिक उन्नतीचा हात मिळाला आहे. वर्षभरात या बचत गटाला साधारणतः सात लाखापेक्षा जास्त उत्पन्न या हाताच्या व्यवसायातून मिळत आहे.
बीड जिल्ह्यातील ब्रम्हनाथ येळंब येथील निर्मला कानगावकर यांनी 2019 मध्ये महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला या बचत गटाच्या माध्यमातून हळूहळू बचत करायला सुरुवात केली त्यातून कर्ज काढून महालक्ष्मी म्हणजेच गौरी यांचे हात बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.
मराठवाड्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा हा सण साजरा केला जातो .या सणाला महालक्ष्मी चे तयार हात मोठ्या प्रमाणात विकले जातात .त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला, दररोज गावातील बचत गटांमध्ये असलेल्या महिलांना काम मिळू लागले त्यातून त्यांना उत्पन्नाचा मार्ग सुरू झाला.
दरवर्षी या बचत गटाच्या उत्पन्न वाढत आहे यावर्षी सात लाख रुपये पर्यंत हातांची विक्री होणार असल्याचे निर्मला कानगावकर यांनी सांगितले.
सुरुवातीला छोट्या प्रमाणात असलेला व्यवसाय आता मोठा झाला आहे. साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये हात बनवण्याच्या कामाला सुरुवात होते ते गौरी गणपती पर्यंत सुरू असते. दररोज चे घरकाम संपल्यानंतर या महिला एकत्र येऊन दुपारी हात बनवण्याचे काम करतात. कच्चा कापडाचे हाताची डिझाईन करून ते कापून व्यवस्थित पणे शिवून त्यामध्ये कापूस भरून त्यांना हाताचा आकार दिला जातो .
काही जणी हात भरण्याचे काम करतात काही जणी हाताना बांगड्या घालून त्यावर डिझाईन काढण्याचे काम करतात अशा पद्धतीने दररोज पाच ते सहा महिला हे हात बनवण्याची काम करतात
मोनाली कानगावकर,कार्यकर्ती बचत गट यांनी संगितले की,तयार केलेले हात मराठवाड्यातील व्यापारी त्यांच्याकडून घेऊन जातात आणि त्या त्या भागात विकता विकतात., त्यामुळे छोट्याशा खेड्यांमध्ये आता या बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी होत आहे तर स्थानिक महिलांना ही त्याचे रोजगार मिळत आहे.शेती मधे काम करत दुपारी हे काम होत असल्याने चांगला रोजगार या माध्यमातून मिळत असल्याचे महिलांनी सांगितले. यामधून त्यांच्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी आर्थिक हातभार लागत असल्याचे मंगल अंबादास गोरे, बचत गट कार्यकर्ती यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांनी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची निर्मिती सुरू केल्यामुळे दिवसेंदिवस या व्यवसायाला आणखी गती मिळत असल्याचे दिसत आहे.