बीड
Beed heavy rainfall बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे बिंदुसरा तसेच इतर छोटे-मोठे तलाव,नदी,ओढे तुडुंब भरले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री झालेल्या पावसाने पीक, पशुहानी, शेतकरी बांधव व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे तर यंदाच्या पावसाळ्याच्या सप्टेंबर महिन्याच्या ितसऱ्या अाठवड्यात जिल्ह्यातील एक माेठे,१६ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले तर १५० प्रकल्प ९३.९८ टक्के भरले अाहेत.
बीड जिल्ह्यात मागील २४ तासांत एकुण सरासरी ३७.८ मी.मी. पर्जन्यमान झाले आहे. एकुण ८६ मंडळांपैकी १५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे. जुन ते सप्टेंबर मान्सुन सरासरी ( ५६६.१ मीमी) आहे. त्याच्या तुलनेत प्रत्यक्ष ( ५७६.९ मीमी) पर्जन्यमान झाले आहे. सरासरी १०१.९ टक्के पर्जन्यमान झाले आहे. बीड तालुक्यातील नाळवंडी मंडळात ६७ मी.मी., येळंब घाट ७०.३ मी.मी. अतिवृष्टी झाल्याची नाेंद अाहे. अाष्टी तालुक्यातील : दाैलावडगाव मंडळात ८०.८ मी.मी., धानाेरा ९६.३, कडा ६७.०, पिंपळा ९१.०, टाकळसिंग ६७.०, दादेगाव ९६.३ मी.मी. अतिवृष्टी झाल्याची नाेंद अाहे. अंबाजाेगाई तालुक्यातील लाेखंडी मंडळात ८६.५, ममदापूर पाटाेदा ८६.५ मी.मी., केज तालुक्यातील केज मंडळात ७४.३ , युसूफ वडगाव ६६.३, हाेळ ६८.८ मी.मी. तर शिरुर कासार तालुक्यातील शिरुर कासार मंडळा १०४.३ मी.मी. अतिवृष्टी झाल्याची नाेंद अाहे.
पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी : आ.संदीप क्षीरसागर
बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर (का) तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये दि.२८ ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या आणि १३ सप्टेंबर २०२५ पासून ते आजपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने क्षेत्रातील उभा असलेला सोयाबीन, कापूस, बाजरी आदी पिकांचे तथा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतकरी बांधवांच्या पाळीव पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. यासह शहरी व ग्रामीण भागात देखील पावसामुळे मोठी पडझड झाली आहे. आजपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने विद्युत पोल, तारा व रोहित्र नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी बांधवांना व ग्रामस्थांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
जिल्ह्यातील काही मंडळांत दाेन-तीन वेळा अतिवृष्टीची नाेंद
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून जिल्ह्यात सर्वदुर पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात एकूण ८६ महसुली मंडळ अाहे. दि. १५ सप्टेंबर पर्यंत सर्वच महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नाेंद झाली अाहे. काही महहसुली मंडळात दाेन – तीन वेळा अतिवृष्टी झाल्याची नाेंद जिल्हा प्रशासनाकडे झालेली अाहे.
शेती पिकांचे नुकसान; नुकसान भरपाईची मागणी
बीड जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या अाठवड्यापासून पावसाने हजेरी लावली अाहे. मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले तर जुन महिन्यात हंगामी पावसाने देखील सरासरी ७ जुन पासून प्रारंभ केला. जुन महिन्याच्या अखेरीस पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करुन घेतल्या. मात्र जुलै महिन्यात बऱ्याच दिवसांचा खंड पडल्याने शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. अाॅगस्ट महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला परंतु पिकांना बळकटी मिळाली नाही. सप्टेंबर महिन्यात अनेक िठकाणी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत अाहे.
माजलगाव प्रकल्प ९४.८७ टक्के भरले
माेठे प्रकल्प : बीड जिल्ह्यात माजलगाव प्रकल्प हा एकच माेठा प्रकल्प अाहे. २०२३ ते २०२५ या पाच वर्षात प्रथमच १५ सप्टेंबर २०२५ या तारखेला माजलगाव प्रकल्प ९४.८७ टक्के भरल्याची नाेंद अाहे. या प्रकल्पाची संंचाय पाणी पातळी मिटर ४३१.८० एवढी अाहे. प्रकल्पीय संकल्पिय साठा हा ३१२.००० अाहे. दि. १५ सप्टेंबर २०२५ राेजी २९६.००० दलघमी साठा उपलब्ध झाला असून त्याची टक्केवारी ९४.८७ अशी झाली अाहे. मागील पाच वर्षे : २०२४ : १२९ दलघमी उपयुक्त साठा (४१.३५ टक्के) २०२३ वर्षी : ३८.३०० दलघमी उपयुक्त साठा, २०२२ वर्षी : २३०.८०० दलघमी उपयुक्त साठा, २०२१ वर्षी : २९३.६०० दलघमी उपयुक्त साठा, २०२० वर्षी : २६८.४० दलघमी उपयुक्त साठा हाेता.
बीड जिल्ह्यातील मागील ५ वर्षातील प्रकल्पीय साठा
( माेठे, मध्यम, लघु प्रकल्प : १६७ : एकूण उपयुक्त पाणी साठा : ७६९.६७१)
वर्ष———— पाणीसाठा दलघमी———— पाण्याची तुट
२०२५ ——– ७२३.३०५ ——————— ४६.३६६
२०२४ ——– ४५२.६४३ ——————— ३१७.०२८
२०२३ ——– ८५.४२७ ———————- ६८४.२४४
२०२२ ——– ४७५.५५० ——————– २९४.१७१
२०२१ ——– ६६२.५३८ ——————– १०७.१३३