बीड
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी मुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानिक शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना दि. 23.09.2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
बीड जिल्ह्यात दि.22.09.2025 पासून मुसळधार पाऊस चालू आहे. बीड जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तसेच तालुक्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडली असल्याने बीड जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घड्डु नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालय यांना सुटी जाहीर केली आहे.
ज्याअर्थी, नमूद अनुक्रमांक 2 अन्वये प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यातील त्या त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्हा करिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क्रमांक 2 कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.