बीड
Beed kharip crop compansation राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी पोटी शासनाने मदत जाहीर केली आहे.या पोटी बीड जिल्ह्यातील 114773 बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील मूग सोयाबीन उडीद बाजरी यासारखी पिके नष्ट झाली.
यासंदर्भात प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर यासंदर्भातील शेतकऱ्यांना द्यावयाची मदत आज सरकारने जाहीर केली.
या कालावधीत छत्रपती संभाजी नगर विभागातील बीड जिल्ह्यात एक लाख 14 हजार 773 बाधित शेतकरी बाधित झाले. जिल्ह्यातील 66,731.80 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यापोटी शासनाने शेतकऱ्यांसाठी 5673.90 रुपये लक्ष निधी (56.74 कोटी )मंजूर केला असून तो जिल्हाधिकारी यांच्या मार्फत वाटप केले जाणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने 139 कोटी 49 लक्ष 25 हजार इतका निधी मंजूर केला आहे.
या संदर्भातील शासन आदेश राज्य सरकारने आज जारी केला आहे.