Thursday, October 23, 2025

बीड जिल्ह्यात आगामी तीन दिवसात अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

.

बीड

Beed weather predictions महाराष्ट्रात पावसाळ्यातील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग तसेच बीड जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे .

वेळोवेळी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले असून नागरिकांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे .


“पूरप्रवण भागातील नागरिकांनी प्रशासनाशी पूर्ण सहकार्य करावे . नदी, नाले, धरण, तलाव या ठिकाणी जाणे टाळावे . सुरक्षित स्थळी हलण्यास प्रशासनाने सांगितल्यास त्वरित पाऊल उचला,” असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले .

अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की “अधिकृत सूचनांचे पालन करा, अफवांवर विश्वास ठेवू नका . महत्त्वाची कागदपत्रे, औषधे, अन्नसाठा आणि पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवा .” अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांनी इशारा दिला की “पूराच्या पाण्यातून पायी किंवा वाहनाने जाणे जीवघेणे ठरू शकते . मोबाईल चार्ज ठेवावा, सुरक्षित पाणीच वापरावे .”


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी सांगितले की “ पूरस्थिती किंवा आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा .

प्रशासन पूर्णपणे सज्ज असून त्वरित मदत पुरवली जाईल .” त्यांचा संपर्क क्रमांक 95 61 49 94 49 असून आपत्कालीन संपर्क 1077 / 1000 / 992 असे उपलब्ध आहेत .


यनिमित्ताने तहसीलदार शेळके यांनी आवाहन केले की “हवामान विभागाच्या इशाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष द्या . नदी, नाले, तलाव यांच्या पातळीतील बदलावर लक्ष ठेवा . पूराच्या वेळी लहान मुले, वृद्ध, महिलांची विशेष काळजी घ्या .”


पावसाचे चित्र (25 सप्टेंबर 2025) : बीड जिल्ह्यात कालच्या 24 तासांत सरासरी 0.6 मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण 788.9 मिमी पाऊस झाला आहे .

हा वार्षिक सरासरीच्या तुलनेत 139.4% इतका आहे . बीड 872.6 मिमी (146.8%), पाटोदा 815.2 मिमी (151.3%), आष्टी 575.4 मिमी (105.4%), गेवराई 819.7 मिमी (139.6%), माजलगाव 843.4 मिमी (136.7%), अंबाजोगाई 831.7 मिमी (131.5%), केज 742.5 मिमी (127.2%), परळी वैजापूर 754.7 मिमी (120.2%), धारूर 906.6 मिमी (135.4%), वडवणी 623.5 मिमी (103.8%), शिरूर कासार 841.5 मिमी (163.2%) अशी नोंद आहे .

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून शिरूर कासारमध्ये सर्वाधिक 163.2%, तर पाटोदा, बीड, माजलगाव, धारूरमध्ये 130% पेक्षा जास्त पाऊस झाला आहे .
हवामान खात्याचा अंदाज : भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज दिला असून बीड जिल्हा सतत यलो अलर्टवर राहणार आहे .
२५ सप्टेंबर २०२५ : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांसह बीड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट आहे .


२६ सप्टेंबर २०२५ : अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे .


२७ सप्टेंबर २०२५ : बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट, तर मुंबई शहर, पुणे घाट, रायगड, सातारा घाट, कोल्हापूर घाट, लातूर, धुळे, नांदेड येथे ऑरेंज अलर्ट आहे .
२८ सप्टेंबर २०२५ : बीड जिल्ह्यात यलो अलर्ट, घाटमाथा व कोकणातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट, कोल्हापूर घाट, नाशिक घाट येथे ऑरेंज अलर्ट .


२९ सप्टेंबर २०२५ : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सातारा घाट, कोल्हापूर घाट, नाशिक घाट, पुणे घाट या भागांत ऑरेंज अलर्ट, तर बीडसह इतर मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे .
पावसामुळे अनेक नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत ; काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे .

अनेक नागरिकांच्या घरात व शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे . या संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकदिलाने व धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे.

Beed weather predictions “तरुण मित्रांनी पुढे यावे ;

आपले हात मदतीसाठी पुढे करावेत . वृद्ध, निराधार, आजारी नागरिक यांना आधी मदत करावी . कोणत्याही परिस्थितीत जीवित हानी होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी . आपण सर्व खंबीर आहात ; आपल्यातले बळ मला माहीत आहे . या संकटावर आपण एकत्रितपणे मात करू . प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे . मदतीसाठी व संपर्कासाठी आपण नेहमी तयार आहोत . कधीही संपर्क साधा,” असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आवाहन केले आहे .

             

.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles