बीड
Beed zp Teachers relieve बीड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या कार्यमुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून यासंदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी भगवान फुलारी यांनी यासंदर्भातला आदेश जारी केला आहे.
यानुसार दिनांक 18 सप्टेंबर च्या दुपारनंतर कार्यमुक्त केले जाणार असून दिनांक 19 सप्टेंबर रोजी सर्व शिक्षक आपल्या बदली झालेल्या शाळेत रुजू होणार आहेत.
बीड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली संदर्भात मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांनी मागच्या आठवड्यात शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर या संदर्भातील जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्या कोर्टात हा निर्णय टाकला होता.
दरम्यान शिक्षकांना कधी कार्यमुक्त केले जाणार हा प्रश्न विविध संघटनांकडून वारंवार विचारला जात होता. या संदर्भात विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा शिक्षणाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन कार्यमुक्ती संदर्भात निवेदनही देण्यात आले होते.
त्यानुसार आता प्रत्यक्षात कार्यवाही केली जात असून हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमानंतर दिनांक 18 रोजी दुपारनंतर या शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार असून दिनांक 19 सप्टेंबर रोजी हे शिक्षक नवीन शाळेवर रुजू होणार आहेत.
जिल्ह्यामध्ये एकूण बदली पात्र शिक्षक 4603 असून यापैकी सात शिक्षकांची चौकशी होणार आहे त्यानंतरच त्याबाबत निर्णय होणार असल्याने हे सात शिक्षक वगळता सर्वांच्या बदल्या होणार आहेत.
यामध्ये संवर्ग एक मधील 826
संवर्ग दोन मधील 310
संवर्ग चार मधील 3350
आणि बदली पात्र शिक्षक क्रमांक दोन यातील 103 असे मिळून 4596 शिक्षक कार्यमुक्त केले जाणार आहे.