Sunday, October 19, 2025

बीड जिल्ह्यात महापुरामुळे मोठे नुकसान ; शिरूर,आष्टी,बीड मध्ये अतिवृष्टी

बीड

heavy rainfall in beed district जिल्ह्यामध्ये दिनांक 22 रोजी 48.4 मिलिमीटर इतका पावसाची नोंद झाली. यामध्ये 86 मंडळांपैकी महसूल मंडळांपैकी 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. जिल्ह्यातील एकूण 19 प्रकल्पापैकी 16 प्रकल्प 100% भरले असून माजलगाव प्रकल्पांमधून सहा वक्रद्वारे 88 हजार 594 क्युसिक क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. उर्ध्व कुंडलिका प्रकल्प 82 टक्के भरले असून मांजरा धरण 98 टक्के भरले असून सहा वक्रद्वारे 27,166 विसर्ग सुरू आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह ते डोंगर किन्ही, रायमोह ते येवलवाडी बीड तालुक्यातील बोरखेड ते शिंदेवस्ती दरम्यानचा पूल वाहून गेला. पाटोदा तालुक्यातील सत्तर लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. यामध्ये पारगाव घुमरा येथील 25 नागरिकांना पूरस्थितीमुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले. पाटोदा शहरातील 45 नागरिकांना तहसील कार्यालयामध्ये स्थलांतरित करण्यात आले.

शिरूर आणि बीड तालुक्यातील एका घराची पडझड झाली आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

शिरूर तालुक्यातील ब्रह्मनाथ येळम, डोंगर किन्ही तसेच बीड तालुक्यातील आहेर चिंचोली या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला होता आता पाणी कमी झाल्यामुळे संपर्क पूर्ववत होत आहे.

शिरापूर तालुका शिरूर येथील नगरपरिषद बीड मार्फत पुरामध्ये अडकलेल्या सात नागरिकांना सुखरूप पणे बाहेर काढण्यात आले. गेवराई तालुक्यातील पिंपळगाव कानडा येथे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या 24 नागरिकांना एनडीआरएफ बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक रवाना झाले आहे. बीड तालुक्यातील नांदूरहवेली येथे सिंदफना नदीच्या पूर आल्याने गावाला वेडा पडला असून पूर परिस्थितीमध्ये 15 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पथक आले आहे. गेवराई तालुक्यातील भूजगाव येथे अडकलेल्या महिलेला इंडिया एन डी आर एफ च्या मदतीने बाहेर काढण्यात आले. पाटोदा तालुक्यातील वनवेवाडी शेंडे वस्ती येथील पाझर तलाव फुटण्याच्या भीतीने गावातील 50 लोकांना डोंगर माथ्यावर नेऊन बसवले होते त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधून उगम होणारे सिंदफना नदी आहे. या नदीच्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाटोदा, शिरूर, माजलगाव या तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने शेती पिकाचे नुकसान झालेले आहे.

सिंदफणा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो एकर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. दरवर्षी पावसाळ्यात महापुराचा तडाखा बसत असला तरी यंदा पावसाचा जोर अधिक असल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles