बीड
Lcb arrests one नवगन राजुरी ता.जि.बीड येथे बस स्थानक परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवगण राजुरी येथील बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या विना नावाचे टपरी मध्ये गुलाबी रंगाचे टि शर्ट व काळी जिन्स् पॅन्ट् घातलेल्या इसमांनी त्याचे पॅन्ट्च्या आतमध्ये एक गावठी कट्टा खवलेला आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला असता एक व्यक्ती गावठी कट्ट्यासह आढळून आला.
प्रदीप अशोक वखरे, वय 27 वर्ष, रा. माळी गल्ली, राजुरी (न) असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याचे अंगझडती घेतली असता पॅन्ट्च्या आतमध्ये एक गावठी कट्टा मॅगझीनसह मिळून आला. सदरील गावठी कट्टा त्याला गणेश श्रीराम बहीर रा. राजुरी (न) ता.जि बीड यांने दिल्याचे सांगीतले. दोन्ही आरोपीविरुदध् पोलीस ठाणे बीड ग्रामीण गु.र.नं 237/2025 कलम 3/25 शस्त्र अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनित काँवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, विष्णु सानप, विकास राठोड, भागवत शेलार चालक अतुल हराळे यानी केली आहे.