येळंब (घाट)
Marathwada mukti Sangram मराठवाडा मुक्तीसंग्राम देशाच्या स्वातंत्र्यानंतर जनतेने लढवलेला पहिला स्फूर्तिदायक लढा असून या लढ्यात बीड जिल्ह्याचे अमूल्य योगदान असल्याचे प्रतिपादन बळवंतराव कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य राजकुमार कदम यांनी केले.
येथील बळवंतराव कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि.17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ति संग्रामदिना निमित्त प्राचार्य राजकुमार कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेच्या प्रांगणात पार पडलेल्या गावातील प्रमुख ध्वजारोहण ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी इयत्ता पाचवी ते बारावी तील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर घोषणांनी सजलेल्या प्रभातफेरीने संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रसंगी ‘100 तास स्वच्छते’साठी ही शपथ उपस्थित सर्व मान्यवरासह विद्यार्थ्यांना देण्यात आली तर शालेय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड झालेल्या प्रशालेच्या विद्यार्थिनींचे त्यांच्या मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री मोहिते एम. व्ही. यासोबत अभिनंदन व कौतुक करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य श्री राजकुमार कदम यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची संघर्षगाथा , बलिदान शौर्य व लोह पुरुषाची सिद्धता याविषयी माहिती देतानाच मुक्तीसंग्राम लढ्यातील बीड जिल्ह्याचे व येळंब (घाट) पंचक्रोशीने दिलेल्या योगदानाचे सविस्तर विवेचन केले.सोहळ्यात प्रशालेचे माजी प्राचार्य श्री रामहरी कदम,श्री खाकरे बी. के.,माजी उप मुख्याध्यापक श्री टेकाळे जे.डी.श्री राम कदम,यासह येळंब (घाट) गावचे सरपंच,उप सरपंच, माजी सरपंच,उप सरपंच ग्रा. पं.सदस्य,विविध पदाधिकारी, माजी सैनिक,सेवा निवृत्त कर्मचारी,तलाठी, ग्रामसेवक,पत्रकार, व शिक्षण प्रेमी नागरिक ,सर्व प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन श्री.घाटे ए. एस. यांनी केले तर आभार श्री सोंडगे बी. बी. यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व लिपिक श्री सुधीर पायाळ,श्री.लहाने डी. एस. ,श्री सोनटक्के एस. डी. आणि श्री मोहिते एम. व्ही.,श्री भोसले ए.एन. श्रीमती गणगे व्ही. एम. श्रीमती सरवदे सी. जी. यासह सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.