मुंबई:
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसानीबाबत राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF)अंतर्गत आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसानीबाबत सविस्तर निवेदन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून (NDRF) भरीव मदत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.