बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी
बीड,दि.24
बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सिंदफणा नदीला पूर आल्याने या नदीचे पाणी बऱ्याच शेतामध्ये घुसल्याने शेतपिकांचे बरेच नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी आज गेवाराई तालूक्यातील धोंडराई आणि हिरापूर येथील पूराने नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली.
यावेळी श्रीमती. मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन, बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणार असल्याचे आश्वासित करुन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे, परंतू शासनामार्फत पुरग्रस्त भागातील बाधीत नागरिक आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
शासन नागरिकाच्या पाठीशी उभे असुन कोणीही काळजी करू नये. नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना शासन लवकरात लवकर मदत करणार आहे. शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ज्या भागात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी घोषित करण्याचा नियम आहे परंतु 65 मिमी पेक्षा कमी पाऊस झाला असेल त्या ठिकाणचेही पंचनामे करण्याच्या सूचना ही श्रीमती पंकजा मुंडे यांनी यावेळी प्रशासनाला यावेळी दिल्या.
यावेळी आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसिलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह धोंडराई आणि हिरापूर येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.