कडा
दोन दिवसांपुर्वी पतीने गळफास घेऊन पुणे येथील राहत्या घरी आत्महत्या केली.अंत्यविधी,सावड्यांना विधी करून कुटुंबासह गावाकडे आलेल्या पत्नीने पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने तिने देखील तान्हा बाळाला घरी ठेऊन विहीरीत उडी घेऊन जिवन संपवल्याची घटना गुरूवारी सकाळी समोर आली.स्वाती नंदू नागरगोजे-गर्जे वय वर्ष २२ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
पाटोदा तालुक्यातील घुगेवाडी येथील नंदू नागरगोजे यांचा विवाह आष्टी तालुक्यातील खिळद येथील स्वाती गर्जे हिच्यासोबत काही महिन्यापुर्वी झाला होता.हे दाम्पत्य पुणे येथील शेवाळवाडी येथे वास्तव्यास होते. पत्नी गरोदर असल्याने तीन महिन्यापुर्वी खिळद येथे आई,वडिलांकडे आली होती.तर पती नंदू नागरगोजे यानी पुणे येथील घरी तीन,चार दिवसांपुर्वी गळफास घेऊन जिवन संपविल्याची घटना घडली होती.
कुटुंब अंत्यविधि व सावड्यांना कार्यक्रम करून बुधवारी घरी आले.गुरूवारी पहाटेच्या दरम्यान काही दिवसांच्या तान्ह्या बाळाला झोपतेच सोडून पतीच्या निधनाचा विरह मनाला लागल्याने स्वातीने घरापासून जवळच असलेल्या एका विहिरीत उडी घेऊन जिवन संपविल्याची घटना घडली आहे.
अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव सातव, पोलीस अंमलदार शिवदास केदार, कृष्णा लव्हारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेहावर धामणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.