बीड पोलिस अपघातग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी हाय-एंड टॅब्सचे वितरण

बीड

बीड जिल्हा पोलिस दलाकडून अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध अपघातसंबंधी मदत व विमा योजनांचा लाभ जलद गतीने मिळावा, या साठी राज्य शासनामार्फत देण्यात आलेले हाय एन्ड टॅब्स वितरित करण्यात आले.

अपघातातील जखमी व मृतांच्या कुटुंबीयांना Prime Minister’s National Relief Fund (प्रधानमंत्री राहत निधी) तसेच इतर केंद्र शासनाच्या अपघात विमा योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी, अपघाताची अचूक व तत्काळ नोंद होणे अत्यावश्यक असते. यासाठी Integrated Road Accident Database (IRAD) आणि e-Detailed Accident Report (e-DAR) या प्रणालींमध्ये माहिती त्वरित भरणे गरजेचे आहे.

याच पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी २ हाय-एंड टॅब्सचे वितरण करण्यात आले आहे. या टॅब्सच्या माध्यमातून अपघातासंबंधी माहिती घटनास्थळीच त्वरीत IRAD व e-DAR प्रणालीमध्ये नोंदवता येणार असून, त्यामुळे अपघातग्रस्तांना शासकीय मदत व विमा दावे लवकर मंजूर होण्यास मदत होणार आहे.


पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या हस्ते हे टॅब्स संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बीड श्री. सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई सौ. चेतना तिडके, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी एपीआय सानप उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles