बीड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! हरवलेल्या 3 अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन सुरक्षित घरी पाठवल्या

बीड:
बीड पोलिसांनी हरवलेल्या मुली सापडल्या या मोठ्या यशात बीड शहर पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत घरातून निघून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहे.
या प्रकरणातील सर्वात आव्हानात्मक भाग म्हणजे तिसऱ्या मुलीचा शोध. ती नांदेडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे संबंधित मुलगी स्वतः मोबाईल वापरत नव्हती. मात्र, एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून सोशल मीडियाद्वारे संपर्क साधल्याचा धागा पोलिसांच्या हाती लागला.
या माहितीच्या आधारे बीड पोलिसांनी नांदेड पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. स्थानिक माहितीदारांच्या सहाय्याने मुलगी एका विद्यार्थिनीच्या रूमवर राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले.
तिन्ही मुली सापडल्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात आले. कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना सुरक्षितपणे घरी परत पाठवण्यात आले. या प्रक्रियेत बालकल्याण विभागाची भूमिका महत्त्वाची ठरली.
तपासादरम्यान असेही दिसून आले की, पालक आणि मुलांमधील संवादाचा अभाव व सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे मुली घर सोडण्याचे निर्णय घेतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद वाढवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles