Home प्रादेशिक बातम्या शिरूर पंचायत समितीची टीम मूल्यांकनासाठी जामनेरला दाखल -मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत गावांची...

शिरूर पंचायत समितीची टीम मूल्यांकनासाठी जामनेरला दाखल -मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत गावांची करणार पाहणी

0
9

शिरूर:-

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत पंचायत समिती,शिरूर कासारची तालुकास्तरीय मूल्यमापन समिती जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे सोमवारी दाखल झाली असून अभियानातील सहभागी ग्रामपंचायतींना भेटी देणार आहे.

ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन 2025-2026 या आर्थिक वर्षापासून राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत संदर्भीय शासन निर्णयानुसार सूचना प्राप्त आहेत.

त्यानुषंगाने शिरूर कासार पंचायत समितीची टीम भेटी देण्यासाठी दाखल झाली असून या समिती मध्ये अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी भरत नागरे यांच्यासह पत्रकार गोकुळ पवार,विस्तार अधिकारी बी.बी.वाघ,नितीन तिजोरे,सखाराम बांगर,कनिष्ठ अभियंता व्ही.आर.बहिरवाळ,गटशिक्षणाधिकारी प्रशांत शिंदे,तालुका व्यवस्थापक अब्दुल सय्यद यांचा समावेश आहे.या समितीने सोमवारी जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द या ग्रामपंचायतीला भेट देऊन मूल्यमापन कामाला सुरूवात केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here